लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी गाळ्यांच्या प्रश्नावर जि.प.समोर उपोषण केले होते. आता वसमत तालुक्यातीलच व राकाँच्याच जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण यांनी शिक्षणासह विविध प्रश्नांवर वाद्यासंगीत आंदोलन सुरू केल्याचे आज पहायला मिळाले.हिंगोली जि.प.त मागील काही दिवसांपासून बाह्य आक्रमणामुळे सदस्य आधीच हैराण आहेत. त्याविरोधात लढण्यासाठी मध्यंतरी सदस्य एकत्र आले होते. मात्र आता आपसी युद्ध सुरू झाले आहे. कुठे पदाधिकारी व सदस्यांत तर कुठे पदाधिकाऱ्यांतच लढा सुरू झाला आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या सदस्यांची तर कामेच होत नसल्याचे दिसत असून एकापाठोपाठ उपोषणे सुरू आहेत. विशेष म्हणजे हा पक्ष जि.प.तील सत्ताधारी आहे!आज रत्नमाला चव्हाण यांनी हट्टा येथील माध्यमिक शाळेच्या शाळाखोली बांधकामाच्या निविदेची संचिका प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप करून उपोषण आरंभिले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांचे व शिक्षण सभापतींचे खटके उडत होते. जि.प.च्या सभांमध्येही त्याचा प्रत्यय आला. आता उपोषणामुळे तर हा वाद चव्हाट्यावरच आला आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले की, २२ आॅक्टोबर २0१८ पासून बांधकाम विभागाने अर्थ विभाग व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे ही संचिका सादर केली. मात्र ती प्रलंबित ठेवून २ नोव्हेंबरला शिक्षण विभागास परत पाठविली. आता तेथेच ती प्रलंबित आहे. याबाबत उपोषणाचा इशारा दिला तरीही ती प्रलंबित राहिल्याने प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. गुन्हे दाखल करण्यास वेळ असलेल्या कर्मचाºयांना संचिका निकाली काढण्यास वेळ का नाही? हा त्यांचा रास्त सवाल. उपोषण सुरू झाल्यावर अख्खी जि.प. ते सोडविण्यास झटताना दिसत होती.
जि.प.समोर वाद्यसंगीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:22 AM