शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 12:59 PM

Dispute over playing Ludo : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील घटना

ठळक मुद्दे मोबाईलवर लुडो किंग हा गेम खेळत असताना अडथळा आणलामध्ये करू नको, असे म्हटल्याने संतापून केला चाकूने वार

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : मोबाईलवर लुडो किंग गेम खेळत असताना, अडथळा आणणाऱ्यास अडवल्याने वारंगा फाटा येथे एकास चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. गंगाधर कान्होबा वाढे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर अप्पाराव शामराव जिनेवाड असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ( Interrupted playing ludo; When asked, stabbed the young man) 

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे रात्री ९ वाजता गंगाधर कान्होबा वाढे (वय २५) हा काही जणांसोबत मोबाईलवर लुडो किंग हा गेम खेळत होता. या दरम्यान, अप्पाराव शामराव जिनेवाड तेथे आला. गंगाधर लुडो खेळताना अप्पाराव मध्येमध्ये करत होता. त्यास गंगाधरने शांत बस मध्ये- मध्ये करू नको, असे म्हटले. यामुळे संतापलेल्या अप्पाराव याने गंगाधरच्या पोटात चाकूने भोसकले आहे.

गंगाधर वाढे याने २३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अप्पाराव शामराव जिनेवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी अप्पाराव हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. बोधनपोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख बाबर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली