रिॲलिटी चेक
हिंगोली: शहरात अग्निशमन कार्यालय आहे. परंतु, या कार्यालयाचा कारभार गत काही वर्षांपासून स्वच्छता विभागाच चालवत आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असले तरी, त्यांच्याकडे शासनाची तशी कोणतीही पदवी शिक्षण नाही. पण घटना कधीही घडो, तातडीने हे कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात. आता शासनाने स्वतंत्र अग्निशमन कार्यालयाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
जुन्या नगर परिषदेच्या बाजूला म्हणजे शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवर सद्य:स्थितीत हे कार्यालय वसलेले आहे. आजमितीस या कार्यालयाकडे दोन बंब (दोन गाडी) कार्यरत असून १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये चालक ५ असून फायरमन पदावर १३ कर्मचारी कार्यरत आहेत.
- अजून एका बंबाची आवश्यकता...
सद्य:स्थितीत अग्निशमन कार्यालयाकडे दोन बंद आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता अजून एका बंबाची आवश्यकता आहे. नवीन एक बंब मिळावा यासाठी, शासनाकडे पाठपुरावा केला आहे, असे अग्निशमन विभागाने सांगितले.
चालक राहतात सतर्क...
अग्निशमन विभागाकडे दोन गाडीवर ५ चालकांची नियुक्ती केली आहे. घटना कधीही घडो. तत्परतेने हे चालक घटनास्थळी जाऊन आग विझवतात. साप्ताहिक सुटी असली तरी बोलाविले की तातडीने कार्यालयात येतात. कामाच्या बाबतीत आळसपणा करीत नाहीत.
कार्यालयात १८ कर्मचारी...
आजमितीस कार्यालयाकडे १८ कर्मचारी आहेत. परंतु, हे सर्व कर्मचारी स्वच्छता विभागाचे आहेत. शासनाने अग्निशमन कार्यालयात तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. सध्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी प्रशिक्षण घेऊन हे कार्यालय चालवितात.
- नियम काय सांगतो?
२४ तास ड्यूटीवर राहणे हा नियम आहे. त्याप्रमाणे नेमलेले १८ कर्मचारी हे २४ तास ड्यूटीवर असतात. घटनेच्या बाबतीत अलर्ट राहतात. कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात करीत नाहीत.
प्रतिक्रिया...
एका गाडीची आवश्यकता
हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाडी (बंब) हे अपुरे पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली