हिंगोली : वीस वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करत २ डिसेंबर रोजी जेरबंद केले.
सुमारे २० वर्षापूर्वी हिंगोली पोलीस ठाणे शहर येथे गुरनं १८३ कलम ४५२, ३२४, ५०४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याचा कोर्ट केस नंबर १६१ असा आहे. न्यायालयाने ५ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यास फरार घोषित केले होते. त्याचा डारमन फाईल नंबर ४/२०१५ असा असून स्टॅडिंग वॉरंट २१ फेब्रुवारी २०१५ रोजी जे.एम.एफ.सी.कोर्ट नं.०२ हिंगोली यांनी काढलेला असल्याची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मंगेशनगर परभणी येथे जाऊन फरार आरोपी सय्यद बशीर सय्यद इस्माईल यास ताब्यात घेतले.
आरोपी सुरवातीला तो मी नव्हेच असे म्हणून उडवाउडवीचे उत्तरे देत होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तो फरार आरोपी हा असल्याचे खात्रीलायक पटवून दिले. आरोपीने बनावट नावाचा वापर करून आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रेही बनविली असल्याचे सूत्रांकडून कळाले. त्यानंतर सय्यद बशीर याने फरार आरोपी सय्यद बशीर मीच असल्याचे कबूल केले. त्यावरून त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, पोहेकॉ बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांच्या पथकाने केली आहे.