शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

सोडेगाव येथे जलदिंडीचा समारोप कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:04 AM

लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.जलदिंडी समारोप प्रसंगी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, औंढा पं. स. सभापती भिमराव भगत आदी उपस्थित होते.खा. राजीव सातव यांनी जलदिंडीत सर्व सहभागींचे अभिनंदन केले. कयाधू मुख्य नदी असून लोकसहभाग मिळाला तर नदी जिवंत होऊ शकते असे ते म्हणाले. केंद्रशासनाकडूनही या कामासाठी मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना खा. सातव म्हणाले प्रत्येकांनी दैनंदिन डायरी लिहिण्याचा सराव करावा. स्वत:चा गुरु हा स्वत:च असतो. डायरी लिहिण्याची सवय जडली तर आपण किती चुकलो किंवा यशस्वी झालो याचा अभ्यास करणे शक्य होते. त्यातून सुधारणाही करता येते असे त्यांनी सांगितले.आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून वाहते. तसेच नदीचे खोरे हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नदी जिवंत झाली तर बहुतांश कुटुंब सुखी होतील व शेतीविषयक समस्यांना आळा बसेल.उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले जल हे जीवन आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी उपसा थांबवून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.विभागीय वनाधिकारी केशवराव वाबळे म्हणाले पर्यावरण दिनाच्या निमिताने जलदिंडीचा समारोप होत आहे. परंतु प्रत्येकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच रोपांची जोपासनाही करावी. जर जंगलाचे प्रमाण वाढले तर जमिनीतील पाणी पातळी वाढू शकेल. जैवविविधता टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना झाड वाटप करण्यात आले. उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईराव म्हणाले सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. जर पाणी नसले तर समस्या वाढतील आणि मानव विकास निर्देशांकही खालावला जाईल. त्यामुळे कयाधू नदीला पाझर फोडावा लागेल. त्यासाठी लोकांच्या मनात पाझर फोडणे गरजेचे आहे. शाहीर धम्मानंद इंगोले यांनी गीत सादरीकरणातून महत्त्व सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक