लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : परभणी हिंगोली राज्य रस्त्यावर औंढा तालुक्यातील जवळाबाजार जवळ १७ मैल परिसरात जवळाबाजारहून हट्ट्याकडे जाणारी क्रुझर जीप क्र. एमएच ३८ व्ही ०९७८ ला शनिवारी ४.५० वाजता उलटल्याची घटना घडली.वसमत तालुक्यातील हट्टा येथील परिहार व बुंदेल कुटुंब हे भोकरदन जि. जालना येथे सकाळी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. ते जिंतूर-औंढा मार्गे जवळाबाजारकडून हट्ट्याकडे जात असताना जीप उलटून अपघात झाला. अपघातात हट्टा येथील ताराबाई हनुमानसिंग परिहार, भगवानसिंग दगडूसिंग परिहार, शोभाबाई संजयसिंह बुंदेल, सुशिलाबाई भगवानसिंह परिहार, अनिताबाई गजेंंद्रसिंग बुंदेल, गजेंद्र रमेशसिंग बुंदेल, लक्ष्मीबाई अंगदसिंग बुंदेल, पिंटू बंडसिंग बुंदेल, अंगदसिंग बुंदेल सर्व रा. हट्टा ता. वसमत आदी जखमी जखमी झाले आहेत. जखमींना जवळाबाजार खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना परभणी येथे पाठविण्याची तयारी सुरू होती. घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले होते.
जीपला अपघात;जखमींवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:22 AM