शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

के. सी. वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबीयांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 8:41 AM

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली.

हिंगोली :  काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, सातव कुटुंबीयांपैकी एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसे निवेदनही वेणुगोपाल यांना देण्यात आले.     वेणुगोपाल हे बुधवारी दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबीयांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चाही केली. अत्यंत गोपनीय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबीयांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यानंतर खासदार सातव यांना श्रद्धांजली अर्पण करून ते दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आ. अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसPoliticsराजकारण