शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

कळमनुरी ग्रामीण रुग्णालय पुन्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:07 AM

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांद्वारे परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यात कळमनुरी ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा प्रथम पुरस्कार मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांद्वारे परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यात कळमनुरी ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा प्रथम पुरस्कार मिळाला.यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सीईओ एच.पी. तुम्मोड, महिला व बालकल्याण सभापती रेणुकाताई जाधव, बाबा नाईक, विठ्ठल चौतमल, डॉ.सतीश पाचपुते, डॉ.राहुल गिते, भानुदास जाधव आदींची उपस्थिती होती.६ उपकेंद्रांना प्रशस्तीपत्रजिल्ह्यातील सहा उपकेंद्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जवळा बाजारमधील उपकेंद्र पोटा, डोंगरकडामधील उपकेंद्र सुकळी, उपकेंद्र वारंगा, आखाडा बाळापूरअंतर्गतचे उपकेंद्र शेवाळा, कापडसिनगीअंतर्गतचे उपकेंद्र बन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रतीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक दिले. यात पिंपळदरी, लोहरा आणि मसोड येथील आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथला उत्तेजनार्थ तर वैयक्तीक पुरस्कार मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आशा क्षीरसागर यांना पारितोषिक दिले.फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारजिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्कारामध्ये सामान्य रुग्णालयातील ज्योती पवार प्रथम, आखाडा बाळापूर आरोगय केंद्रातील विजयमाला आल्लडवाड द्वितीय आणि साखरा आरोग्य केंद्रातील प्रीती काकडे यांना तृतीय पुरस्कार मिळाला.एल. एच. व्ही.एलएचव्हीमध्ये तिघींना प्रथम पुरस्कार विभागून दिला. यात पानकनेरगावच्या रागिणी शेजूळ, जवळा बाजारच्या सी. बी. लोंढे, पिंपळदरीच्या शांता वागतकर तर द्वितीय बाळापूरच्या आशा कांबळे आणि पोत्र्याच्या एस. बी. सोरणी या तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.एएनएममधून कवठा येथील केंद्राच्या पूनम चाटसे प्रथम, शेवाळ्याच्या मुक्ता मुंढे द्वितीय, फाळेगावच्या पी. डी. देशपांडे आणि पोत्रा येथील ए. के. मारकळ तृतीय.फ्लोरेन्स नाईटिंगेल उत्तेजनार्थ प्रशस्ती पुरस्काराच्या १४ जणी मानकरी ठरल्या. यामध्ये जवळा बा.च्या शीतल पतंगे, सामान्य रुग्णालयाच्या रागिणी जोशी, फाळेगाव केंद्राच्या पी. के. इंगोले, वाकोडीच्या उषाताई पाटे, बसंबाच्या व्ही. एस. सेवलकर, जलालधाबा शोभा शिंदे, आडगावच्या पी. बी. हानवते, जामगव्हाणच्या सुजाता लवटे, जवळा बाजारच्या सुलोचना लिलर्वे, गिरगावच्या के. एम. राखे, गौळबाजार सीमा मोरे, मोरवडच्या व्ही. एस. गोमासे, कुर्तडीच्या एस. डी. पाटील आणि वाईच्या मोना विल्यम्स यांचा समावेश आहे.याशिवाय कुटुंबकल्याणच्या कामासाठी परिचारिका, डॉक्टर व विविध आरोग्य संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.सर्वोत्कृष्ट आरोग्य संस्थांअंतर्गत उपकेंद्रात वाकोडी पीएचसीअंतर्गत गौळ बाजार उपकेंद्रास प्रथम १५ हजार व स्मृती चिन्ह, पांगरा शिंदे पीएचसीअंतर्गत उपकेंद्र वाई -द्वितीय १० हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. पिंपळदरी पीएचसीअंतर्गतचे उपकेंद्र जामगव्हाणला तृतीय ५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असा पुरस्कार मिळाला.प्रा. आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमधून प्रा. आरोग्य केंद्र गोरेगावला प्रथम पुरस्कार २५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. प्रा. आ. पोत्रा यांना द्वितीय १५ हजार, गिरगावला तृतीय १० हजार तर ग्रामीण रुग्णालय कळमनुरीला प्रथम ५० हजारांचा पुरस्कार मिळाला.