लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केबीसी प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब छब्बू चव्हाण यास हिंगोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. शर्मा यांनी ७ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे.२0१४ मध्ये राज्यातील विविध भागांत केबीसीचा घोटाळा उघडकीस आला होता. हिंगोली जिल्ह्यातही या व्यवसायाचे जाळे एजंटांमार्फत पसरवले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर फसवणूक झाल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. कळमनुरी येथील पोलीस ठाण्यात शिवाजी भवर यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ३.४१ कोटी रुपयांची वेगवेगळ्या लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाने चव्हाणला न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. आजपर्यंत तो कोठडीत आहे. विविध बाबींचा दाखला देत आरोपीतर्फे अॅड.शफिक रशीद सय्यद यांनी जामीन मागितला होता. तो मंजूर झाला.
केबीसीतील आरोपीस जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:43 AM