गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:02 PM2021-05-26T19:02:59+5:302021-05-26T19:05:19+5:30

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली.

K.C.Venugopal, close to the Gandhi family, visits the Late Rajeev Satav's family; Confidential discussion done after consolation | गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा

गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देवेणुगोपाल हे काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, खासदार राहूल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातातया गोपनिय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

हिंगोली : काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत माजी मंत्री रजनीताई सातव, डॉ.प्रज्ञा सातव, पुष्कराज, तितली यांच्याशी वेणुगोपाल यांनी चर्चा केली.

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनीटे चर्चाही केली. अत्यंत गोपनिय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबियांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर खासदार सातव यांना श्रध्दांजली अर्पण करून ते दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, खासदार राहूल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनिय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आ. अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आ. डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, डॉ. सतीष पाचपुते, एस. पी. राठोड, रमेश जाधव, प्राचार्य बबन पवार, विलास गोरे, नंदकिशोर तोष्णीवाल, केशव नाईक, बापुराव घोंगडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देऊन सातव कुटुंबातील एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: K.C.Venugopal, close to the Gandhi family, visits the Late Rajeev Satav's family; Confidential discussion done after consolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.