शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

मोदींसारखा खोटारडा माणूस पंतप्रधानपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:18 AM

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर वर्धापन दिनाच्या गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे झालेल्या कार्यक्रमात ते हिंगोलीत बोलत होते. यावेळी गणेशराव पडघन यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कवाडे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करायला आल्यावर डॉ.आंबेडकरांच्या घटनेमुळे चहावाला पंतप्रधान झाल्याचे सांगतात. तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री अनंतकुमार हेगडे संविधान बदलण्याची भाषा करतात. भाजपाचे इतरही अनेक लोक हे बोलतात. मात्र त्यांचे हे षडयंत्र पूर्ण होऊ दिले जाणार नाही. आंबेडकरांनी सामान्यांना, वंचितांना सत्तेचा वाटा मिळावा, असे म्हटले. मात्र भाजपवाल्यांचा त्याला विरोध आहे. पंधरा लाख खात्यावर टाकण्याचे आमिष दाखवून निवडून आले. नंतर नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सामान्यांच्या खिशातला पैसा पळवला. मोठ्यांना तो वाटला. असे हे खोटारडे असल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाचा मोर्चा निघाला. तेथे हजारो समाजबांधव ठाण मांडून बसले होते. तेव्हा तेथे देवेंद्र फडणवीस गेले. पहिले काम हे आरक्षण देण्याचे करू, असे म्हणाले. मात्र अजून काहीच नाही. हे बनवाबनवीचे सरकार आहे. शेतकऱ्यांची तर घोर फसवणूक केली. देशात जातीयवाद वाढवला. महिलांची सुरक्षितता राहिली नाही. त्यामुळे अशांना पुन्हा थारा देऊ नका, असे आवाहनही कवाडे यांनी केले. तर सोळा वर्षांच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर झाले. हा लोक शाहीचा, चळवळीचा विजय असून त्यामुळे या भागात समतेचे राज्य प्रस्थापित झाल्याचेही ते म्हणाले.यावेळी गोपाळराव आटोटे, आर.एल.तांबे, अ‍ॅड.जे.के. नारायणे, जयदीप कवाडे, दिलीप साठे, दिलीप भिसे आदी मान्यवरांची उपस्थिती होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSocialसामाजिक