लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : हिंगोली येथे कुस्त्या खेळून रात्री ९ वाजेदरम्यान गाव परतणाºया मल्लाच्या दुचाकीस सुरेगाव, पिंप्री फाट्यावरील पुलाजवळ दुचाकीला अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, सोबतचा गंभीर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.सहदेव तुकाराम आव्हाड (१८, रा.पेरजाबाद) व मित्र वामन गंगाराम जुमडे हे आपल्या दुचाकीवरून हिंगोली येथील कुस्त्यांच्या कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत होते. सुरेगावच्या पुलावर आले असता अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये सहदेव आव्हाड जागीच गतप्राण झाला. औंढा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी त्यास मयत घोषित केले.या घटनेची नोंद अद्याप औंढा पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले.दुचाकी क्र. एम.एच.३८ एस. ३५३४ वर सहदेव येत होता. पेरजाबाद येथे २३ जानेवारी रोजी सहदेववर अंत्यसंस्कार करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या औंढा-हिंगोली रस्त्यावर ८० लाख रुपये खर्चूनही खड्डे बुजवणे, दुतर्फा झाडे-झुडपे तोडणे, वळण रस्त्यावर सफाई करणे, साईडपट्ट्या भरणे इ. कामे व्यवस्थित न केल्यामुळे अपघात वाढले आहेत.
पेरजाबादचा मल्ल अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:02 AM