जड वाहनांचा बाजारात शिरकाव
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक आदी वर्दळीच्या भागात जड वाहनांना बंदी असताना वाहने सर्रास येत असून वाहतुकीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
टपाली मतदान सहायता केंद्र स्थापन
हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हिंगोली तहसील कार्यालयात टपाली मतदान सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतपत्रिका हस्तगत करण्याकरिता ज्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांनी २ जानेवारी ते ४ जानेवारीदरम्यान सायंकाळी सहा वाजेपर्यंत टपाली मतपत्रिकेचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील कापड गल्ली, पेन्शनपुरा, मंगळवारा आदी भागांतील नाल्या मागील काही दिवसांपासून साफ करण्यात आल्या नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी येत असल्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नांदेड नाका ते औंढा नागनाथ रस्त्यावर खड्डे
हिंगोली: नांदेड नाका ते औंढा नागनाथ या मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अतोनात त्रास होत आहे. दुसरीकडे या रस्त्यावरील गतिरोधकही धोकादायक बनले आहेत. वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वेगाने जात आहेत. संबंधित विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.