हिंगोली : बिज गुणन केंद्र व फल रोपवाटीकेतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यां संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे २२ आॅक्टोबरपासून हिंगोली येथील जिल्हा कृषि कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटनतर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे.सर्व तालुका बिज केंद्रावरील रोजंदारी कामगारांचे वेतन २० पेक्षा जास्त महिन्यांचे थकले आहे. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडणींणा तोंड द्यावे लागत आहे. विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कामगार उपोषणास बसले आहेत. प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनावर शेषराव चव्हाण, तुळशीराम भाग्यवंत, नागनाथ स्वामी, बबन खराटे, केशरबाई लडके आदींच्या स्वाक्षºया आहेत.
कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:04 AM