लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वित्त आयोगातून दहा टक्के निधी कपात करून घेण्यासाठी प्रशासन घाई करते. मात्र संगणक परिचालकच गायब राहात असून स्टेशनरी मिळत नसताना हा नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याची तक्रार जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली.शासनाने राज्य स्तरावरून निविदा काढून प्रत्येक ग्रामपंचायतीवर संगणक परिचालक थोपविला आहे. मात्र अनेक ठिकाणी ते येतच नसल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी मात्र हे परिचालक इमाने-इतबारे काम करीत आहेत. त्यांना ३३ प्रकारचे काम आॅनलाईन करणे बंधनकारक आहे. शिवाय ज्या संस्थेने परिचालक पुरवायचे काम घेतले त्यांनी ग्रामपंचायतीचे काम चालविण्यासाठी लागणारी स्टेशनरी दरमहा देणे आवश्यक आहे. परंतु असे काहीच ग्रामपंचायतींना मिळत नसतानाही सरपंचांना वित्त आयोगातून प्रत्येकी बारा हजारांचा धनादेश देणे का बंधनकारक केले, असा सवाल सरपंचांनी केला. तसेच मग्रारोहयोची जुनी रखडलेली कामेही केली जात नाहीत अन् विहिरींच्या नवीन कामांनाही प्रारंभ केला जात नाही, अशी तक्रारही केली. यावेळी गोविंद भवर, धम्मदीपक खंदारे, संतोष पवार आदींची उपस्थिती होती.यावेळी उपमुख्य कार्यकारी नितीन दाताळ म्हणाले, या योजनेतील परिचालकांना त्यांनी केलेल्या कामाइतकाच मोबदला देण्यात येतो. शिवाय स्टेशनरी व इतर साहित्य मिळत नसल्यास सरपंच व ग्रामसेवकांनी तसे अद्याप लेखी कळविणे अपेक्षित होते. याबाबत लवकरच सर्व सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेतली जाईल. जिल्ह्यात साडेतीनशेच्या आसपास परिचालक आहेत. त्यांनाही या बैठकीस बोलावून या कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.आंदोलनाचा इशाराग्रामपंचायतींनी सिंचन विहिरी, शेततळे, गुरांचे गोठे, शोषखड्डे, पाणंद रस्ते आदी कामे मग्रारोहयोतून करण्यासाठी प्रस्ताव देवूनही ते मंजूर केले जात नाहीत. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांचे कार्यारंभ आदेश नाहीत, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. तर संगणक परिचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून कपात केले जात आहे. त्याचा विकास कामांवर पिरणाम होत आहे. ते कापू नये, अशी मागणीही केली. निवेदनावर भागूबाई गोविंद भवर, धम्मदीपक कांबळे, छाया पडघाण, गीताबाई वाबळे, यशवंत राठोड, रेणूका पवार आदींच्या सह्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २५ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरपंचांनाही भेटेनात संगणक परिचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:31 AM
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : वित्त आयोगातून दहा टक्के निधी कपात करून घेण्यासाठी प्रशासन घाई करते. मात्र संगणक परिचालकच ...
ठळक मुद्देसरपंच संघटना आक्रमक : वित्त आयोगातून होणारी कपात थांबविण्याची केली मागणी