माजीमंत्री काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी सातव अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 04:08 PM2024-02-19T16:08:50+5:302024-02-19T16:17:34+5:30

एक धाडसी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या

last rights on Ex-minister senior Congress leader Rajni Satav | माजीमंत्री काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी सातव अनंतात विलीन

माजीमंत्री काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी सातव अनंतात विलीन

कळमनुरी: माजीमंत्री, काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे १८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी रात्री उपचारादरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. १९ फेब्रुवारी दुपारी बारा वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवदेहावर कळमनुरी शहरातील विकासनगर येथे साश्रूनयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातू पुष्कराज सातव याने त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. 

माजीमंत्री रजनीताई सातव यांच्या चितेला भडाग्नी दिल्यानंतर पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्द उभे राहून रजनीताईंना श्रद्धांजली वाहिली. रजनीताई सातव यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. एक धाडसी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केली.

अंत्यसंस्काराच्यावेळी खा. हेमंत पाटील, माजी खासदार शिवाजी माने, आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माजीमंत्री माधवराव किन्हाळकर, माजी आ. आमदार डॉ. संतोष टारफे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार  विजय खडसे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब देशमुख, दिलीप चव्हाण, बी. डी. बांगर, गोपू पाटील, दिलीप देसाई, सचिन नाईक, जकी कुरेशी, डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. दिलीप मस्के, संजय बोंढारे, नेहाल भैय्या, श्रीकांत पाटील, अजित मगर, बाळासाहेब मगर, शिवाजी शिंदे, बाळासाहेब देशमुख, डॉ. एल. डी. कदम, बाबा नाईक, मुनीर पटेल, चंद्रकांत देशमुख, भागवत चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, सुधीर सराफ, अ. हफीज अ. रहेमान, शिवा घुगे, प्राचार्य बबन पवार, विनोद बांगर आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: last rights on Ex-minister senior Congress leader Rajni Satav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.