मूर्तिकार बनवारी स्वामी व त्यांचे सहकारी शिल्पकार हे रोज ९ ते १० तास काम करीत आहेत. मूर्तीचे काम हे अंदाजे २ महिन्यांत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. या मंगल कार्यासाठी प.पू. राष्ट्रसंत गणाचार्य श्री १००८ विरागसागर महामुनीराज यांच्या पावन आशीर्वादाने व प.पू. श्रमणमुनीश्री १०८ विशेषसागर गुरूदेव यांचे मार्गदर्शन व सान्निध्य झाले आहे. पुसेगाव येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी भव्य वेदी शिलान्यास, विहंगे परिवर्तन व गुरू उपकार दिवस हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील भक्तगण यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी व संपूर्ण माहिती विधी विधान पं. दीपककुमार बा. उपाध्ये सांगली, विद्यासागर ॲण्ड पार्टी अकीवार यांच्या सुमधुर वाणीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मूर्ती समिती अध्यक्ष राजेंद्र जैन, मूर्ती निर्माण प्रमुख कैलश मुटे, कार्याध्यक्ष रवी कान्हेड, भालचंद्र कान्हेड, संजय वाळले, सुदर्शन कान्हेड, कीर्तीचंद भुरे, प्रदीप भुरे, दशरथ मागूळकर, दत्ता साळवे यांनी केले.