लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे. एवढे मोठे क्षेत्र असल्याने जवळपास प्रत्येक शेतकºयाच्या शेतात हे पीक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीनवरील करपा व अळीचा प्रादुर्भाव शेतकºयांमधून मोठी ओरड होण्यास कारणीभूत ठरला आहे. विरोधकच नव्हे, सत्ताधारीही यासाठी निवेदने देत आहेत. शेतकरी भेटेल त्याला पीकविमा व नुकसान भरपाईबाबत प्रयत्न करण्याची याचना करीत आहे.यामध्ये बहुतांश शेतकºयांना मोठा फटका बसला असला तरीही कृषी विभागाने केवळ पीकविमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पीकविमा कंपन्या दरवर्षीच विमा भरून घेतल्यानंतर मात्र फिरकत नाहीत. कितीही बोंब झाली तरीही त्यांची प्रक्रिया पूर्ण करूनही दाद दिल्याचे चित्र कधीच दिसले नाही. त्यामुळे शेतकºयांना यंदाही तो भरवसा वाटत नसल्याने निवेदनांचा पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे हा ओघ वाढल्याचे चित्र आहे.शेतकºयांच्या रेट्यापुढे पुढारीही आता जिल्हा कचेरी, तहसीलच्या चकरा मारून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशा मागणीची निवेदने देताना दिसत आहेत.
नेत्यांच्या चकरा, शेतकरीही हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:48 AM