लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील कृषी विभागात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत साहित्य व शेत तळ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सोडत काढली.यामध्ये सामूहिक शेततळ्यासाठी ६२, २० हॉर्सपॉवरचे ५८ ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट ५५, हळद कूकर ८२ आणि शेडनेट ३० असे एकूण ३०५ शेतकºयांची सोडत काढण्यात आली. ही सोडत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही काढण्यात आली. आता संबंधित शेतकºयांची ज्येष्ठता सूची बनविण्याचे काम सुरू असून, निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील महिन्यात अनुक्रमानुसार शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. तसेच जिल्ह्याला अद्याप उद्दिष्ट मंजूर झालेले नाही. मात्र निधी प्राप्त होताच अनुक्रमानुसार शेतकºयांना साहित्य वाटप केले जाणार असून, शेततळ्यासाठी निधी दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार त्याची तालुकानिहाय सोडत काढण्यात आली. हिंगोली येथील कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी अधिक्षक विजय लोखंडे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकºयांची उपस्थिती होती.मुख्याधिकाºयांना निवेदनहिंगोली : शहरातील नगरपालिके अंतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय मोकाट गुरांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शहरातील वाहतुकीचा तसेच रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन अशोक सुरूशे यांनी न. प. मुख्याधिकारी यांना दिले.शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देण्यची मागणी केली.
कृषी अवजारांसाठी घेतली सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:50 PM