हिंगोली: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे प्रकरणांचा निपटारा करण्यास वेळ लागतो आहे. कमी मनुष्यबळाअभावी जवळपास ३ हजार प्रकरणे सद्यस्थितीत प्रलंबित पडली आहेत.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात ११ शासकीय पदे मंजूर आहेत, परंतु सद्य:स्थितीत चार पदांवरच कामकाज करावे लागत आहे. यामध्ये १ संशोधन अधिकारी, १ पोलीस अधिकारी, १ क्लार्क आणि १ शिपाई यांचा समावेश आहे. कंत्राटी कामगारांची १० पदे मंजूर आहेत, परंतु ४ कामगारांनाच कामकाज करावे लागत आहे. यामध्ये १ व्यवस्थापक, १ संशोधन सहायक, १ अभिलेखापाल, १ प्रकल्प सहायक यांचा समावेश आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे अध्यक्षपद व उपायुक्तपदही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारीच आहे. अध्यक्ष हे नांदेडहून येतात, तर उपायुक्त हे वाशिम येथून येतात. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे
१० रोज दाखल होणारी प्रकरणे
३०० एका महिन्यात दाखल प्रकरणे
३०० रोज निकाली निघणारी प्रकरणे
३००० प्रलंबित असलेली प्रकरणे
समितीकडील मनुष्यबळ
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे शासकीय ४ आणि कंत्राटी ४ असे सद्यस्थितीत मनुष्यबळ आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा वाढला आहे. परिणामी, प्रकरणे निकाली काढण्यासाठी उशीर होतो आहे.
प्रतिक्रिया
बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहेत.
- गीता गुठ्ठे, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, हिंगोली