हिंगोली : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यातच २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, काही ठिकाणचा वीजपुरवठाडी खंडित झाला होता.
जिल्ह्यातील वसमत, नांदापूर, पिंपळरदरी, कंजारा, वसई, जामगव्हाण, टाकळगव्हाण, दांडेगाव, जवळा पांचाळ, पार्डी खुर्द, गिरगाव, कहा (बु), जवळा बाजार, हट्टा, दिग्रस, करंजी, विरेगाव आदींसह अनेक गावांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. रविवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी सुरू केली होेती. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी सव्वा वाजेदरम्यान शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.