लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्रा. आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली असून औषधी पुरवठा नाही. तर रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले.याबाबत २७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले होते. मात्र याची वरिष्ठ अधिकाºयांनी कोणतीच दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेवून प्राथमिक आरोग्य केंद्राला १० एप्रिल रोजी कुलूप ठोकले मात्र तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले. नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांतर्गत २० ते २२ गावांतील दररोज १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने इतर ठिकाणी जावे लागते. आजघडीला आरोग्य केंद्रामध्ये दोन पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद, सेवक दोन पदे, सफाई कामगार एक पद अशी एकूण आठ पदे रिक्त आहेत.दरम्यान, डॉ. मृणाल डोणेकर यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून येथील केंद्रामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या अधिकारी नर्सी येथे येत नसून तालुका आरोग्य अधिकाºयांच्या सांगण्यावरून डिग्रस येथील उपकेंद्रामध्ये काम करीत आहेत. तसेच येथील कार्यरत असलेले डॉ. गजानन हरण हेसुद्धा दोन दिवसांनी औरंगाबाद येथे जाणार असल्याने येथे कर्मचाºयांचा मोठा तुटवडा झाला आहे. त्याचबरोबर येथे गोळ्या, इंजेक्शन, सलाईन व इतर औषधी साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने येथील ग्रामस्थांनी वरिष्ठांना वारंवार कळवूनही त्यावर काहीच उपाय होत नसल्याने १० रोजी कुलूप ठोकले. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी लेखी आश्वासन देवून तीन दिवसांमध्ये काही पदांची पुर्तता करण्याचे सांगितल्याने कुलूप उघडण्यात आले. तर तीन दिवसांमध्ये काहीच पूर्तता न केल्यास पुन्हा कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी भागवत सोळंके, इरफान खॉ पठाण, राहुल धाबे, पंडित गायकवाड, श्रीरंग धाबे, मोईस, हरि मोरे, विठ्ठल गायकवाड, शेख तस्लीम, भिकाजी कीर्तनकार, प्रताप दिपके आदी ग्रामस्थ हजर होते.
नर्सी पीएचसीला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:22 AM