राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

By विजय पाटील | Published: November 12, 2022 01:02 PM2022-11-12T13:02:39+5:302022-11-12T13:11:36+5:30

मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉक्टर लंडनमध्ये स्थायिक आहेत,

London doctor worried for India's future; Join Bharat Jodo Yatra directly with family | राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

Next

हिंगोली : खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra )  सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. एक अनिवासी भारतीय कुटुंब तर थेट लंडनहून आले असून मागील सहा दिवसांपासून या यात्रेत पायी चालत आहे.

मूळचे रायगड जिल्हयातील महाडगाव महाडचे असलेले डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे. तरीही ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे, आरुष कांबळे हेही आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. 

याबाबत विचारले असता डॉ. सुबोध कांबळे म्हणाले, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबद्दल कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांचे जे देश जोडण्याचे प्रयत्न आहेत, त्यांना साथ देण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न खुप महत्त्वाचा आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत, त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत.

भारुलता म्हणाल्या की, आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे. अनेक भाषा, धर्म जाती आहेत. मात्र तरीही एकत्रित राहतो. आम्ही धर्म, जातीमध्ये विभागलो नाही पाहिजे. ही यात्रा एखाद्या पक्षाची यात्रा आहे म्हणून याकडे पाहात नसून ही यात्रा खरेच भारत जोडण्यासाठी असल्यानेत्यात सहभागी झालो आहोत.

Web Title: London doctor worried for India's future; Join Bharat Jodo Yatra directly with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.