लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अशा कोणत्याही प्रकारची साधने, सीमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू किंवा बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यात सक्त मनाई करण्यात आहे.या परीक्षार्थींची बायोमेट्रिक पध्दतीने ओळख पडताळणी करण्यास सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी केंद्रावर ९ वाजता हजर राहणे आवश्यक आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.दंड वसूलहिंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी १९ मार्च रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १६ वाहन चालकांकडून पोलिसांनी ३ हजार २०० रूपये दंड वसूल केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘राज्य सेवा परीक्षा’ २४ मार्च रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:38 PM