लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत येथे शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी झेंडा चौकात महाआरती करण्यात आली. राममंदिराच्या बांधकामासाठी ही आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रामभक्त सहभागी झाले होते. ‘पहिले मंदिर फिर सरकार’ च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.वसमत येथील झेंडा चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करून महाआरती करण्यात आली. लासीनमठाचे मठाधीश करबसव शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजदार, सुनील काळे, डॉ. अजय मुंदडा, दीपक मुंदडा, बालाजी तांबोळी, काशिनाथ भोसले, साईनाथ पतंगे, दीपक कुल्थे, आशिष पवार, धनंजय गोरे, सतीष कुल्थे, मनोज चव्हाण, राजेश पवार, राजेश भोसले, गणेश काळे, आनंद बडवणे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी रामभक्त मोठ्या संख्येने हजर होते. हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.हिंगोली येथे महाआरतीहिंगोली : शहरातील गांधी चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने श्री राम भगवान यांची महाआरती घेण्यात आली. यावेळी खाकीबाबा मठाचे महंत कमलदास महाराज, जलेश्वर मंदिराचे महाराज, कालीमाता मंदिर, खडेश्वर बाबा मंदिर येथील महाराज उपस्थित होते. यावेळी विविध मंदिरातील महाराज व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वसमत येथे शिवसेनेतर्फे महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:45 AM