येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हनुमानदास मुंदडा यांची ही जिनिंग आहे.या ठिकाणी खासगी कापूस खरेदी करून त्याच्या कापूस गाठी केल्या जातात. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कापूस प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. कामगारांनी मिळेल, त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र, आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर, हिंगोली पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दीड तासांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस जळून तर काही कापूस भिजल्याने नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे, तर या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामाही केल्याचे सांगण्यात आले आहे.
जिनिंगला आग लागून मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:31 AM