लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले की, ही बैठक घेण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याही जलतज्ज्ञास अथवा राजकीय पुढाऱ्यास बोलावले नाही. शिवाय इसापूर धरणाच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा दुष्काळी स्थिती असताना ७0 टक्के धरण भरले असून ३0 टक्केच विश्वास असल्याचे सांगितले गेले. अशाप्रकारची कोणत्याच धरणाची राज्यात तपासणी झाली नाही. राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचा १७00 हेक्टरचा अनुशेष मान्य केला आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी पाण्याची मागणी केली तर गैर ते काय? या भागातील गावे धरणक्षेत्रात गेली. पाणी मात्र अत्यल्प मिळते. वाशिमला पैनगंगेवरील धरणाच्या मोबदल्यात पाणी उपलब्धता दिली. हिंगोलीलाच विरोध का? असा सवालही माने यांनी केला. तर कयाधूच्या लाभक्षेत्रात ८५ दलघमी पाणी शिल्लक असल्याचे म्हटले आहे, ते अत्यंत चुकीचे असून त्याचे नियोजनही आधीच झाले आहे. नांदेडची सुबत्ता या पाण्याव अवलंबून असली तरीही हिंगोलीकरांचाही मोठ्या मनाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली.
सिंचनाच्या प्रश्नावर माने यांनी दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:02 AM