शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

स्वस्तात डिझेल देतो म्हणून अनेकांना चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:19 AM

अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत. अर्ध्या किमतीत डिझेलची लालूच अनेकांना महागात पडत आहे. फसगत झाल्याची तक्रार द्यावी तर इभ्रत जाते म्हणून कोणी तक्रार देत नाही, अशा फसगत झालेल्यांपैकी दोघांनी वसमत शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.लालच बुरी बला है, असे म्हणतात. मात्र स्वस्तात माल मिळतो म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चोरीचा माल आहे की, कसे हेसुद्धा कोणी पाहत नाही, आणि मग फसवणूक झाली की, गप्प बसल्याशिवाय पर्याय नाही. असाच एक प्रकार वसमत तालुक्यात काही दिवसांपासून घडत आहे. वाहनधारकांना फोनवर एक व्यक्ती संपर्क साधतो. तुम्हाला डिझेल पाहिजे का? मी एक गुत्तेदाराकडे काम करतो वाहनातील बचत केलेले ५० ते १०० लिटर डिझेल आहे. अर्ध्या किमतीत देतो, असे म्हणून तो व्यक्ती लालूच देतो. स्वस्तात डिझेल तेही घरबसल्या म्हणून वाहनधारकही त्याला घरी या असे सांगतात. मग ती व्यक्ती घरी येते. शंभर लिटर डिझेल ३० ते ३५ रुपये दराने देतो म्हणून त्याची रक्कम द्या गाडीत कॅन आहे आणून देतो, असे म्हणून रक्कम घेतो व पसार होत आहे. डिझेलची वाट पाहत वाहनधारक घरीच बसतात. तास- दोन तासानंतर आपली फसगत झाल्याचे स्पष्ट होते. ज्या क्रमांकावरून फोन आलेला असतो तो क्रमांकही बंद असतो.वसमत शहर पोलिसांत सोमवारी संजय खराटे यांनी तक्रार अर्ज देऊन ८० लिटर डिझेल देतो म्हणून अडीच हजार रुपये घेऊन फसवणूक झाल्याचा अर्ज दिला आहे. या अर्जावरून पो.ना. भगीरथ सवंडकर तपास करीत आहेत. यापूर्वीही कौठा रोडवरील एका व्यक्तीने ३ हजाराला फसवणूक झाल्याचा अर्ज दिला होता. अशा कित्येक जणांना चुना लागलेला आहे. मात्र पोलिसांकडे कोणीही आले नाही. ग्रामीण भागातही फसवणुकीच्या तक्रारी आहेत. परंतु आतापर्यंत दोनच तक्रार अर्ज आलेले आहेत.

टॅग्स :DieselडिझेलPoliceपोलिस