हिंगोली : हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे आणि औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजता आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी आजही या आंदोलनाची धग कायम दिसत आहे.
हिंगोली - सेनगाव मार्गावर केसापूर फाट्यानजीक बाभळीचे झाड तोडून रस्त्यावर टाकले. त्यामुळे दोन्हीही बाजूने वाहतूक बंद झाली होती. या ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तर लाख येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या काचा फोडून, मैदानात टायर जाळला. तर रस्त्यावरील वाहनेही थांबविली होती. सकाळपासूनच केसावर आणि लाख येथे आंदोलकांनी वातावरण तापवले होते. या दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता.