याप्रकरणी आयशा शेख महेबूब (रा. अनखळी पोटा, ह. मु. जुमापेठ वसमत) या विवाहितेने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आयशा शेख यांना शेती दुरूस्तीसाठी माहेराहून ५० हजार रूपये घेऊन ये, असे म्हणून सासरचे तगादा लावत होते. यावरूनच अनखळी पोटा येथे २००८ पासून ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत सासरच्या मंडळींनी त्रास करण्यास सुरवात केली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पुन्हा नांदावयास आली तर जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून आयशा शेख यांनी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून शेख महेबूब शेख सुभेदार, शेख सुभेदार शेख करीम, जैतुनबी शेख सुभेदार, शेख अजीज शेख सुभेदार, शेख माशुम शेख सुभेदार, (सर्व रा. अनखळी पोटा ता. औंढा ना.), जायदाबी शेख आयुब (रा. खेर्डा ता. हिंगोली), आबेदाबी हाशम पठाण (रा. रेपा ता. औंढा ना.), शबानाबी शेरूला पठाण (रा. जुमापेठ वसमत) यांच्या विरूद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना. भगीरथ संवडकर करीत आहेत.
५० हजारांसाठी विवाहितेचा छळ ; आठ जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:21 AM