बाजार समितीत आघाडीची विजयी सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:43 AM2018-12-21T00:43:16+5:302018-12-21T00:43:41+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या ७४ अर्जांची छाननी झाली असून ७१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर तीन अर्ज बाद झाले आहेत. बाद झालेले तीनही अर्ज सिंदगी गणातील असून तेथे एकच उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजार समितीची सुरुवातच विजयाने झाले आहे.

In the market committee, winning all the seats | बाजार समितीत आघाडीची विजयी सुरूवात

बाजार समितीत आघाडीची विजयी सुरूवात

Next
ठळक मुद्देआखाडा बाळापूर : सिंदगी गणातील तीन अर्ज बाद

आखाडा बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या ७४ अर्जांची छाननी झाली असून ७१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर तीन अर्ज बाद झाले आहेत. बाद झालेले तीनही अर्ज सिंदगी गणातील असून तेथे एकच उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजार समितीची सुरुवातच विजयाने झाले आहे.
आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया जोर धरत आहे. १३ तारखेपासून सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ तारखेला संपली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. १५ गणात एकूण ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७१ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत .तर तीन अर्ज बाद केलेले आहेत. तीनही अर्ज ओबीसी मतदारसंघासाठी राखीव असलेल्या सिंदगी गणातील आहेत. जात वैधता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र नसल्याचे कारणावरून हे तीन अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे सिंदगी गणात आता अनिल जानकीराम रणखांब या एकमेव उमेदवाराचा अर्ज पात्र ठरल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे .निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. या निवडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.या विजयामुळे आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा, कार्यकर्त्यांचा आनंद दुणावला आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विजयी श्रीगणेशा झाला असून दुसरीकडे सेना-भाजपमध्ये मात्र युतीची खलबतेच सुरू आहेत .अद्यापही सर्व जागांवर युतीची मतेऐक्यता झालेली नाही. त्यामुळे याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. आता कोण अर्ज मागे घेतो आणि लढत कशी होणार आहे याचे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी सद्यस्थितीत आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
वैध, अवैध उमेदवरांची यादी जाहिर
कळमनुरी : २० डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी वैध उमेदवार व अवैध उमेदवार यांची यादी जाहीर केली. १८ संचालकांच्या जागेसाठी ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शेतकरी मतदार संघातील सिंदगी गणातील शिरीषकुमार कंझाडे, साहेबराव मंदाडे यांचे उमेदवारी अर्ज अवैध अथवा अपात्र ठरविण्यता आले आहेत. आखाडा बाळापूर गणातील तीन शेवाळा- ५, घोडा- ४, कांडली-५, वारंगा- ४, डोंगरकडा-०७, जवळा पांचाळ-५, दांडेगाव-२, पेठवडगाव- ३, सिदगी-१, नांदापूर -३, पिंपळदरी- २, जुलालधाबा-२, लाख- ३, कोथळज-४, व्यापारी मतदार संघातील- ५, हमाल, मापाडी मतदार संघातील दोन असे एकूण ७१ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.

Web Title: In the market committee, winning all the seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.