ज्या भागात ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. ज्याठिकाणी ७५ ते १०० मिमी पाऊस कमी पडल्यास शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहणे योग्य राहील. हिंगोलीसह औंढानागनाथ, वसमत, कळमनुरी, सेनगाव आदी ठिकाणी जमिनीतील ओलावा बघून वापसा झाल्यानंतर पेरणी उरकून घ्यावी. दुसरीकडे सोयाबीन पेरण्यापूर्वी कार्बोक्झिम ३७.५ टक्के, थायरम ३७.५ टक्के, डीएस (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मूग, उडीद पेरणीपूर्वी बियाणास प्रति किलो कार्बोक्झिम एक ग्रॅम किंवा थायरम दोन ग्रॅम लावावे. ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ‘वनामकृ’ विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने केले आहे.
कमाल, किमान तापमान कमी राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:39 AM