शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला!

By रमेश वाबळे | Published: December 15, 2023 6:59 PM

हळद मार्केट यार्डात मापात पाप; संशय आल्याने उघड झाला प्रकार

हिंगोली : हळदीच्या एका कट्ट्याचे वजन दोन वेगवेगळ्या काट्यांवर केले असता, अडीच किलोची तफावत आढळल्याचा प्रकार येथील बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात १५ डिसेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास उघडकीस आला. यावरून मार्केट यार्डात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

येथील बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्ड मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दूरवरून शेतकरी हळद विक्रीसाठी येतात. हंगामादरम्यान मार्केट यार्डात सरासरी ३ ते ४ हजार क्विंटलची आवक असते, तर सध्या सरासरी ६०० ते ८०० क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. १५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील समगा येथील शेतकरी बालाजी सरकटे यांनी ६५ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. बिट झाल्यानंतर इलेक्ट्राॅनिक काट्यावर हळद मोजणीला सुरुवात झाली. मापारी विनायक बांगर यांच्या उपस्थितीत मोजमाप सुरू होते. परंतु यादरम्यान शेतकरी सरकटे यांना हळदीचे वजन कमी भरत असल्याबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी ४५ किलो ७०० ग्राम वजन भरलेला तोच कट्टा जवळच असलेल्या दुसऱ्या काट्यावर मोजला असता, ४८ किलो २०० ग्राम भरला. एका कट्ट्यामागे तब्बल २ किलो ५०० ग्राम वजन कमी भरत असल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्याने संताप व्यक्त केला.

‘त्या’ काट्यावर तीन शेतकऱ्यांच्या हळदीचे आधीच झाले होते मोजमाप...शेतकरी बालाजी सरकटे यांच्या हळदीच्या मोजमापापूर्वी चार शेतकऱ्यांची हळद त्याच काट्यावर मोजण्यात आली होती. सरकटे यांची हळदी कट्ट्यामागे अडीच किलोने कमी भरत असल्याचे उघड झाली. यावरून त्या चार शेतकऱ्यांची हळद मोजतानाही गोंधळ झाला असावा, असा संशय मार्केट यार्डात शेतकरी व्यक्त करीत होते.

मापारी म्हणतात; आमचा काय दोष?मार्केट यार्डातील सर्व वजन काटे बाजार समितीचे आहेत. त्या काट्याची वेळोवेळी तपासणी करणे, ते व्यवस्थित सुरू आहेत की नाहीत हे पाहणे गरजेचे आहे. मापारी केवळ शेतमालाचे वजन करून देतो, यात मापाऱ्याचा काय दोष? असे म्हणून मापाऱ्यांनी हात वर केल्याचे पाहावयास मिळाले.

बाजार समितीच्या वतीने पंचनामा...शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराचा पंचनामा केला. यामध्ये मापारी, शेतकऱ्याने किती कट्टे विक्रीसाठी आणले होते, यासंदर्भात माहिती घेण्यात आली. सदर पंचनामा बाजार समिती सचिवांकडे देणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र