लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना आदेश पाठविण्यात आले होते. यातील काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारण सांगून कामातून सूट मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाºयांकडे परवानगी मागितली.यातील तीन कर्मचाºयांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविले आहे. १० एप्रिल रोजी मंडळाकडून वैद्यकीय तपासणी करून त्याच्या प्रमाणपत्रासह अहवाल ११ एप्रिल रोजी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. वैद्यकीय तपासणीबाबत ३ कर्मचाºयांना ८ एप्रिल रोजी पत्र दिले आहे. त्यात प्रमाणपत्रासह अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नसता लोकप्रतिनिधी अधिनियम १९९१ चे कलम १३४ अन्वये कार्यवाही करण्यात येईल. असेही पत्रात नमुद करण्यात आले होते. लोकसभा निवडणूकीच्या कामातून सुट मिळण्यासाठी एका आश्रमशाळेतील तीन कर्मचाºयांनी वैद्यकीय कारण दाखविले होते. त्यावरून सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी वैद्यकीय कारणाची शहानिशा करण्यासाठी वैद्यकीय मंडळाकडे त्यांना पाठविले होते. वैद्यकीय कारण खरे निघाल्यास त्यांना सेवेतून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव कर्मचाºयांच्या वरिष्ठ अधिकाºयांना पाठविल्या जाणार आहे. वैद्यकीय कारण खोटे निघाल्यास त्यांना निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे. वैद्यकीय कारणासाठी निवडणूकीच्या कामातून सूट मागणाºया कर्मचाºयांचे आता धाबे दणाणले आहेत.
वैद्यकीय मंडळाकडून तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:45 PM