लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.मनात राग असल्याने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. रागाच्याभरात अनेक हातून चूका घडतात. परंतु राग शांत झाल्याने रागीट व्यक्ती नंतर पश्चाताप करते. राग ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून निश्चतच राग येतो. रागामुळे नातेसंबधही दुरावतात. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. नेहमी मनात राग असलेल्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिड बनत जातो. त्यामुळे मन उत्साही व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे रागातून सुटका करून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ध्यानसाधना तसेच विपश्यनेचा मार्ग अवलंबविल्यास नक्कीच फरक पडतो. अनेकदा कार्यालयीन जबाबदारी पार पाडताना जर वेळेत काम संबंधित कर्मचाऱ्याकडून झाले नाही तर मलाही राग येतो. परंतु तो राग काही क्षणापुरताचा असतो. काम वेळेत व्हावे हा मनात दृष्टिकोन रूजावा यासाठी राग व्यक्त केला जातो. राग व्यक्त करण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु प्राणायाम, ध्यानसाधना व विपश्यना केल्याने नक्कीच रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा मनाविरुद्ध बाबी होत असल्याने वाद व्हायचे. मात्र नंतर शांततेने घेतल्यास समस्या सोडविण्यास वेळ मिळतो, ही गुरुकिल्ली मिळाली. त्यामुळे आपोआपच संयमाने रागाची जागा घेतली. त्याचा वैयक्तिक आयुष्यात फायदा झाला.
ध्यानसाधना, विपश्यनाने रागावर नियंत्रण शक्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:28 PM