कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे होते. माहेश्वरी महासभेचे महासचिव मदनलाल मणियार, स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी , ब्रिजगोपाल तोष्णीवाल, मराठवाड्याचे अध्यक्ष दागडीयाजी, हिंगोली जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल प्रमोद मुंदडा, अमित चांडक, महेश बियाणी, प्रा. सुरेश धूत आदी उपस्थित होते. माहेश्वरी समाजातील मुला-मुलींच्या लग्नाच्या वाढत्या समस्या पाहता समाजाने आत्मचिंतन करण्याचे गरजेचे झाले असल्याचे व यावर उपाय म्हणून समस्त मारवाडी समाजाने एकत्रितपणे मंथन करणे आवश्यक असल्याचे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमाचा चांगल्या वापरा बरोबरच घराघरांत कौटुंबिक कलहपण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या माध्यमाचा जपून वापर करण्याची वेळ आली असल्याचे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बंकटलाल गट्टानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्रीनीवास लढ्ढा, संजय लोहिया, विनोद झंवर, कमल दरक,मनोज लढ्ढा, संजय काबरा, संजय बाहेती, संदीप बाहेती, नारायण बाहेती, जयकिशन सोनी, प्रवीण सोमाणी, हरिष मुरक्या यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येेने होते.
फोटो नं.६