लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आता पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची अडचण येत आहे. त्यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मागणीवरून मंत्रालयात मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत एक महिन्यात यावर निर्णय देण्यास सांगण्यात आले.हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. यात यापूर्वी कोणीच रेटा न लावल्याने इतर जिल्ह्यांसाठी या भागाचे पाणी पळविण्यात आले. त्यामुळे आता स्थानिक प्रकल्पांसाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बैठकीत नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी ही अडचण मांडली. मात्र या प्रश्नात प्रशासनाने लक्ष घालून हिंगोली जिल्ह्याला अनुशेष मंजूर झाला तर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून मुटकुळे यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याचा आग्रह धरला. एका महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.यावेळी माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, पी.आर. देशमुख आदींसह अधिकारी उपस्थित होते.
पाणी प्रमाणपत्रासाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:45 AM