लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शहरातील जि.प. प्रशालेच्या मैदानावर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १८ नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणूक व समाज प्रबोधन मेळावा झाला.यावेळी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, इतिहासकार श्रीमंत कोकाटे आदींची भाषणे झाली. डॉ.धनजकर लिखित ‘अंधाच कारट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. संतोष टारफे होते. मिरवणूक रविवारी सकाळी दहा वाजता सामाजिक सभागृह येथून शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर धडकली. मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले.यावेळी खा. सातव यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मागील पंधरा वर्षापासून तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र असल्याने आदीवासी समाजाचा आमदार निवडून आला आहे. त्यामुळे समाजबांधवांनी अशीच एकी एक ठेवावी. महापुरुषांचे विचार आचरणात आणा असे त्यांनी सांगितले. तर आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले, मी आतापर्यंत समाजासाठी कार्य करत आलो असून यापुढेही करत राहीन. आपल्या बळावरच मी आमदार झालो. समाजबांधवांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले. यावेळी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते, बबन डुकरे, जनार्दन बोथीकर, रामराव वाघडव, सदाशिव जटाळे, वंदना टारफे, नंदिनीताई टारफे, लक्ष्मण कुरुदे तसेच आदिवासी बांधव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरवले यांनी केले तर आभार लक्ष्मण कुरुळे मानले.श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले की अंधश्रद्धा बाळगू नका, शिक्षणाचा अभाव असल्यानेच अंधश्रद्धा फोफावते. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षणाची कास धरावी. महापुरुषांचे विचार अंगीकारा, बुवाबाजी अंधश्रद्धेवर व राशी भविष्यावर विश्वास ठेऊ नका असा संदेश त्यांनी दिला.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:04 AM