भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:37 AM2018-09-25T00:37:43+5:302018-09-25T00:38:04+5:30
अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबरला जिल्ह्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ११९९ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिक-ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला. भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. उर्वरित गणपती मूर्तींचे २४ सप्टेंबर रोजी विसर्जन केले करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबरला जिल्ह्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ११९९ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिक-ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला. भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. उर्वरित गणपती मूर्तींचे २४ सप्टेंबर रोजी विसर्जन केले करण्यात आले.
गणेश चतुर्थीला जिल्ह्यात जवळपास १ हजार २५५ च्यावर गणेश मंडळांनी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली होती. अनंत चतुर्दशीला २३ सप्टेंबर रोजी १ हजार १९९ गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. उर्वरीत ४२ गणेश मूर्तींचे विसर्जन सोमवारी करण्यात आले. हिंगोली येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे लाखो भाविकांनी रांगेत लागून दर्शन घेतले. २३ सप्टेंबर रोजी श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, शिवाय भाविकांची गर्दी लक्षात घेता २४ सप्टेंबर विसर्जनाची तारीख ठरविण्यात आली होती. त्या अनुषंगाने हिंगोली शहरातील ३० गणपती मूर्तींचे विसर्जन सोमवारी करण्यात आले. तसेच तर कळमनुरी ४ व इतर ठिकाणचे ८ एकूण ४२ गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन सोमवारी केले. विसर्जनस्थळी नगरपालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते. शांततामय वातावरणात गणरायाला भक्तीमय वातावरणात भाविकांनी निरोप दिला. ठिक -ठिकाणी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जनस्थळी व मार्गावर पोलीस तैनात होते. यावेळी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे प्रत्येक हालचालींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर होती. शिवाय पोलीस ठाणे अंतर्गत व्हिडीओ शुटींगही काढण्यात आली. भक्तीमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. २४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील ३० गणपती मूर्तींचे विसर्जन तलाबकट्टा आणि कयाधू नदीत केले. शहरातील तलाबकट्टा परिसरात विसर्जनासाठी पोलीस कर्मचारी शिवाजी पारसकर, मस्के तसेच न. प. चे कर्मचारी हजर होते.
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
४नवसाला पावणारा मोदकाचा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व मोदकाचा नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. २३ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जवळपास दीड लाखावर भाविक हिंगोलीत दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे शहरात जिकडे-तिकडे भाविकांचीच गर्दी झाली होती. यात भाविकांच्या सोयीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेला मंडपही अपुरा पडत होता. या गणपतीच्या महाभिषेकासाठी सकाळी ६ वाजता कावड निघाली. यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी आल्यानंतर महाभिषेक करून सकाळी ९.३० वाजता नवसाचे मोदक वाटपास प्रारंभ करण्यात आला. नवसाचे मोदक घेण्यासाठी लाखो भाविकांची हिंगोलीत गर्दी झाली होती. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत ठिकठिकाणी सभामंडप उभारण्यात आले होते. रांगेत दर्शनासाठी भाविकांना सोडले जात होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही व्यवस्था होती. यात भाविकांसाठी काही ठिकाणी एलईडीही होत्या. शहरवासीयांनीही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचाही भाविकांना लाभ झाला.