लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याला सूक्ष्म सिंचन योजनेत तुषार व ठिबक सिंचनासाठी २0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरता येणार असून १५ मार्च २0१९ पर्यंत त्यासाठी मुदत आहे.शेतकºयांना आपल्या शेतात सिंचनाची व्यवस्था करून कमी पाण्यावर अधिक शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाकडून ही योजना राबिवली जाते. यामध्ये तुषार संच घेण्यासाठी एकरी एक संच घेण्यासाठी १२ हजार रुपयांचे ठरावीक अनुदान दिले जाते. यात २७ ते २८ हजार रुपयांपर्यंत हा संच खरेदी करता येतो. अनुदानाव्यतिरिक्तची रक्कम लाभार्थ्याला स्वत:च्या खिशातून भरावी लागते. तर ठिबक सिंचन योजनेत सर्वसाधारण प्रवर्गात ४0 टक्के तर इतर निकषपात्र शेतकºयांना ५0 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी आतापर्यंत १0५७ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. अजूनही अर्ज करण्याची मुदत संपली नाही. १५ मार्च २0१९ पर्यंत अर्ज करता येणार आहे.हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे काही भागात रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे अशा शेतकºयांना कमी पाण्यावर रबीचे पीक घेण्यासाठी या योजनेचा उपयोग होणार आहे. त्यासाठी मुदतीत आॅनलाईन अर्ज करून अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
सूक्ष्म सिंचनासाठी यंदा २0 कोटींचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:38 AM