कोरोना होवून गेल्यानंतर तीन आठवडे ते एक महिन्यानंतर मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात ० ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना खुप ताप भरणे, चेहरा लाल होणे, सुज येणे, अंगावर विविध ठिकाणी लाल रंगाच्या पुरळ येणे, डायरिया, उलटी, पोटात मुरडून दुखणे आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तीव्र श्वसनाचा त्रास होत आहे. तर पीटी, पीटीटी, डीडायमर वाढलेले आढळते. ईएसआर, सीआरपी व प्रोकैल्सिटोनिन यासारख्या घटकांतही वाढ होते. यामध्ये वेळीच उपचार न झाल्यास मुलांच्या किडनी, ह्रदय, लिव्हर, मेंदूवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळेच या आजाराला मल्टिसिस्टीम इफ्लामेटरी सिंड्रोम असे म्हटले आहे.
या आजाराबाबत आता शासनाकडूनही मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. यामध्ये जर मुलांना ह्रदयरोग, कोरोनाची लक्षणे व मल्टि ऑर्गन समस्या आढळत असेल तर स्टेरॉयड्स - मिथइलप्रेडनिसोलोन मुलाच्या वजनानुसार प्रतिकिलो १ ते ३ मिलीग्राम, इंटरवेनियस इम्युनोग्लोबुलिन २ ग्राम प्रतिकिलो २४ ते ४८ तासांसाठी, अँटिमाइक्रोबॉयल्स अशी औषधी वापरण्यास सांगण्यात आले आहे. यात मुलांची विशेष देखभाल करावी लागते. त्यामुळे मुख्यत: आयसीयूमध्ये उपचाराची गरज असल्याचे म्हटले.
आतापर्यंतचे कोरोना रुग्ण १५४७८
बरे झालेले रुग्ण १४६४०
० ते १८ वयोगटाचे रुग्ण ११३२
एकूण रुग्णांमध्ये प्रमाण १०.४ टक्के
एमआयएस आढळलेले रुग्ण ७