आमदार टारफे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख बांगर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 07:07 PM2018-12-04T19:07:26+5:302018-12-04T19:11:36+5:30
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भर सभेत जातीवाचक शिविगाळ केल्याने गुन्हा
औंढा नागनाथ (हिंगोली ) : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भर सभेत जातीवाचक शिविगाळ केल्याने त्यांच्या विरोधात कळमनुरी विधानसभेचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी आज ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आरोपी संतोष बांगर यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान औंढा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचे निदर्शनास आले. ध्वनीक्षेपणावर वर दोन ते अडीच हजार लोकांसमोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन फिर्यादीचा अवमान केल्या प्रकरणी औंढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्रयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिक्षक सिध्देश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.