यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, विठ्ठल चौथमल, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शिवाजी पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे,जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी,सचिन करेवार, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, मल्हारी चौफाडे, भाऊराव मस्के, गंगाधर लोंढे, योगेश डहाळे, सुरेश पडघन, प्रशांत तुपकरी आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात यापूर्वीपासून एक नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट कार्यरत आहे. आर डब्ल्यु फाऊंडेशन व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्येमाने दुसरे युनिट सुरु करण्यात आले. हे युनिट जिल्ह्यातील ४४ गावात भेटी देऊन ग्रामस्थांच्या विविध आजाराबाबतची तपासणी करणार आहे. यामध्ये गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, प्रसुती, गंभीर बालकांची तपासणी निदान व उपचार, तसेच या युनिट मध्ये ४० प्रकारच्या आजाराची तपासणी व निदान होणार आहे. यामुळे गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत हाेणार आहे. दरम्यान, यामध्ये एक डाॅक्टर, एक सिस्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक लॅब टेक्नीशियन, दोन वाहनचालक असा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
फोटो : २०