हे सुविधा केंद्र बाजारपेठेच्या दूर असल्यामुळे कोणीही इमारत भाड्याने घेण्यासाठी तयार नाही. या आधुनिक सुविधा केंद्रात लाखो रुपयाच्या मशीन धूळखात पडल्या आहेत. या मशीनचा वापर होत नसल्याने त्या निकामी होत चालल्या आहेत. इमारतीची देखभाल दुरुस्ती नसल्याने इमारत जुनाट दिसत आहे. इमारतीत जाळे लागलेले दिसत आहे.हे आधुनिक सुविधा केंद्र २५ मे २०१३ रोजी केंद्रीय कृषिमंत्री व राज्य कृषी व पणन मंत्री यांच्या हस्ते या सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. २०१३ पासून दोन ते तीन जणांनी तात्पुरत्या स्वरूपात हे सुविधा केंद्र भाड्याने घेतले होते. परंतु भाडे व लाईट बिल परवडत नसल्याने त्यांनी ही इमारत सोडून दिली आहे. या सुविधा केंद्रात ठेवण्यात आलेल्या मशीनचा वापर होत नाही. त्यामुळे या मशीन गंजत आहेत. या सुविधा केंद्राचे भाडे जास्त असल्याने कोणी घ्यायला तयार नाही, इमारतीच्या परिसरातही साफसफाई नाही लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत व त्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या मशीन धूळखात पडलेल्या आहेत. या सुविधा केंद्राचा तालुक्यातील शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही. या सुविधा केंद्राचे भाडे कमी करावे व वापरासाठी शेतकऱ्यांना भाड्याने देण्यात यावी अशी मागणी होत आहे
फोटो नंबर ५