लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका ६२ वर्षीय किराणा दुकानदाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी सायं. साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे काही जणांनी दुकानदारास बेदम चोप दिला. तर या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे.गोरेगाव येथील तलाबकट्टा भागात नागनाथ किराणा दुकानामध्ये बिस्कीटचा पुडा आणण्यासाठी गेलेल्या लहान चुलत भावास बोलावून आणण्यासाठी १३ वर्षीय मुलगी गेली होती. तेव्हा दुकानदार वसंता जालीधर ढेंगळे (६२) याने तिच्या हाताला आणि केसाला धरून तिला दुकानामध्ये ओढून घेतले आणि वाईट हेतूने विनयभंग केला. तिने प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने काही तरुणांनी धाव घेतली. या प्रकारामुळे दुकानदारास चांगलाच चोप देत पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत सदर दुकानदाराची संतप्त तरुणांच्या तावडीतून सुटका करीत त्याला ताब्यात घेतले.तद्नंतर सदर घटनेची माहिती गावात पसरली असता पोलीस ठाण्यात २०० ते ३०० लोकांचा मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी रात्री १०.२५ वाजता आरोपी वसंत जालींधर ढेंगळेविरूद्ध कलम ३५४, ३५४ ब, फॉस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.