शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं

By रमेश वाबळे | Published: April 18, 2023 4:39 PM

दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि सासूसोबत होत असत भांडण

आखाडा बाळापूर : जावयाचे मुलीसोबत भांडण सुरू असताना सासूही घालून-पाडून बोलत असल्याने जावयाने शेळ्या बांधायचा खुंटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. दारूच्या नशेत त्याने तिला ठार मारले. पत्नीलाही मारहाण करून स्वत:च्या मुलीचाही हात मुरगाळल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड परिसरात राहणाऱ्या लताबाई नागराव खिल्लारे (वय ५५ वर्षे) यांच्याकडेच त्यांची मुलगी अर्चना व जावई अजय रमेश सोनवणे (वय २७) राहत होता. सासूरवाडीत वास्तव्य व आखाडा बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करून तो उपजीविका करत होता. पत्नी अर्चनासोबत राहताना दोन मुली, एक मुलगा अशा परिवारासह संसार सुरू असताना अजयला दारूचे व्यसन जडले. यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. १६ एप्रिलला दुपारी २ वाजता तो दारू पिऊन घरी आला. जेवण वाढण्याच्या कारणावरून अर्चनाशी त्याचा वाद झाला. तेव्हा मुलीची बाजू घेत लताबाई खिल्लारे यांनी अजयला घालून पाडून बोलत राग व्यक्त केला. मात्र अजयही संतापला. शेळीला बांधण्यासाठी लावलेला खुटा उपटून त्याने सासूच्या डोक्यात घातला. बायकोलाही मारले. मुलीचाही हात मुरगाळला. सासू रक्तबंबाळ अवस्थेत पडली. शेजारच्यांनी तिला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार गंभीर होता, असे उपस्थितांनी सांगितले. प्रथमोपचार करून नांदेडला पाठविले. परंतु त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मावळली.

जावयाला केली अटकघटनेची माहिती होताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे आदी घटनास्थळी पोहोचले. जावई पळून गेल्याचे कळताच तीन पथके स्थापन केली. जावयाला कुर्तडी पाटीजवळ ताब्यात घेतले.

दोन दिवसांपासून जेवायला दिले नाहीअजय याला पोलिसांनी सासूला मारण्याचे कारण विचारले असता दोन दिवसांपासून मला जेवण दिले नाही आणि काहीबाही बोलत होती. त्यामुळे रागाच्या भरात मी तिला मारले अशी कबुलीही त्याने दिली असल्याची माहिती बोधनापोड यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली