लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील रहिवासी इसमाची विवाहित मुलगी व अडीच वर्षांची नात मंठा (जि. जालना) बसस्थानकावरून १५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. विवाहितेच्या पित्याने मंठा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी मिसींगची नोंद घेतली. मात्र अद्याप कोणताही ठावठिकाणा न लागल्याने गूढ वाढले आहे.वसमत येथील रहिवासी पुरभाजी साबळे यांची मुलगी पूर्णा येथे दिलेली आहे. तिला दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांची दुसरी मुलगी मंठा येथे आहे. मंठा येथील मुलीच्या बाळंतपणासाठी पूर्णा येथील मुलगी अर्चना गायकवाड (२५) ही तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह मंठा येथे गेली होती. चार दिवसांनंतर अर्चनाचा पती मंठा येथे गेला व तिला तेथून परत घेवून निघाला. मात्र बसस्थानकावरून अर्चना मुलीसह बेपत्ता झाल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. २६ आॅक्टोबरपासून तिचा काही पत्ता नाही. गायब होण्याच्या घटनेचे गूढ वाढत आहे.या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने मंठा पोलिसांत तक्रार दिली. यात जावयाने तिला परत आणण्यासाठी मारहाण केली होती. त्यांच्यासोबतच ती निघाली मात्र अद्याप ती पोहोचली नसल्याचे साबळे यांचे म्हणणे आहे.२५ वर्षीय विवाहिता व तिची २ वर्षांची मुलगी १५ दिवसांपासून बेपत्ता असताना अद्याप काही थांगपत्ता लागत नसल्याने विवाहितेच्या आई वडीलांवर आभाळ कोसळल्यासारखे वातावरण आहे. पोलिसांनी त्वरित तपास करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
मुलीसह आई पंधरा दिवसांपासून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:16 AM