शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

लेकीच्या हुशारीला आईच्या कष्टाची जोड; झेडपी शाळेची विद्यार्थिनी झाली MPSC तून अधिकारी

By यशवंत भीमराव परांडकर | Published: November 25, 2022 4:22 PM

विद्या कांदेने एसटीआय परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमध्ये मिळविला सहावा क्रमांक

साखरा (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील साखरा येथील विद्या अंकुश कांदे हिने ‘एसटीआय’ (राज्य कर निरीक्षक) परीक्षेमधून महाराष्ट्रातून मुलींमध्ये सहावा क्रमांक पटकाविला. ही परीक्षा जुलै २०२२ मध्ये घेण्यात आली होती. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्याच्या हुशारीला आईच्या कष्टाची जोड मिळाली. अभ्यासात सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर विद्याने मिळवलेल्या यशाने तिचे कौतुक होत आहे. 

साखरा येथील एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या विद्याने एसटीआय परीक्षेची चार वर्षापासून तयारी सुरू केली होती. विद्या कांदेने दहावीपर्यंतचे शिक्षण साखरा जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. दहावीमध्ये तिने ९२ टक्के गुण मिळविले. २३ नोव्हेंबर रोजी एसटीआय परीक्षेचा निकाल लागला असून विद्या कांदे हिने या परीक्षेत ४०० पैकी २७७.५ गुण मिळविले आहेत. महाराष्ट्रातून मुलींमध्ये सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल विद्याचे गुरुजन व गावकऱ्यांनी कौतुक केले.

सातवीमध्ये असताना वडिलांचा मृत्यूराज्य कर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्या कांदे म्हणाली, मी सातवीमध्ये होते त्यावेळेस म्हणजे २०१० मध्ये वडील वारले. यावेळी पुढील शिक्षण होईल की नाही, अशी परिस्थिती होती. आईनेच आमचा संपूर्ण सांभाळ केला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईने शेतात राबून पैसा पुरविला. परिस्थिीती तशी नाजुकच होती. माझ्या व लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावावरच होती. मोठ्या भावाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. परंतु, लहान भावाने हालअपेष्टा सहन करत पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केले आहे.

झेडपी शाळेत शिकून दहावीत ९२ टक्के साखरा येथील जि. प. शाळेत दहावीपर्यत शिक्षण घेतले. दहावीत ९२ टक्के गुण मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुठे जावे? हा मोठा प्रश्न आईपुढे होता. परंतु माझ्या शिक्षणाची काळजी देवालाच होती, असे म्हणावे लागेल. पुढील बारावीपर्यतचे (अकरावी-बारावी) शिक्षण नवोदय विद्यालय परभणी येथे पूर्ण केले.  शिक्षणाचे ध्येय गाठून आई-वडीलांचे नाव मोठे करायचे हाच उद्देश होता. लहान पणापासून मला शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करणे सुरु केले. 

अपयश आले पण हार मानली नाही दरम्यान, एमपीएससी मी दोन परीक्षा दिल्या. परंतु त्यात यश काही आले नाही. परंतु, नाराज न होता पुढे यश पदरात पडेल आणि आई-वडिलांचे नाव मोठे करता येईल म्हणून रात्रंदिवस अभ्यास केला. अखेर यश पदरात पडले. या यशाबद्दल माझ्या आई, दोन भावांना आणि गावकऱ्यांनाही आनंद झाला आहे. 

मला विश्वास होता; यश पदरात पडणार....बीएसाठी रिसोड येथील मुक्त विद्यापीठात प्रवेश केला.  ‘बीए’ ला मला ५५ टक्के गुण मिळाले. राज्य कर निरीक्षक परीक्षा अभ्यास करुन दिली होती. त्यामुळे या परीक्षेत मी हमखास उत्तीर्ण होणार आहे हे मला माहित होते. या यशाबद्दल माझा सर्वत्र सत्कार होत आहे.   माझे वडील आज असते तर त्यांना तर मोठा आनंद झाला असता. मी परीक्षा पास झाल्याचे कळताच आईने मला पेढा भरुन आशिर्वाद दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीMPSC examएमपीएससी परीक्षाzp schoolजिल्हा परिषद शाळा