लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात निवेदन देताना अहमदनगर येथील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांच्या अंगावर काही जणांनी शाई फेकली. सदर घटनेच्या निषेर्धात हिंगोली येथे सामाजिक न्याय भवन अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांनी ४ डिसेंबर रोजी लेखणी बंद आंदोलन केले.शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाºयांवर शाई फेकणाºया हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. जिल्हा जात पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आयुक्त कार्यालय, जि. प. समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त भारत केंद्रे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जातपडताळणी समितीच्या डॉ. छाया कुलाल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण भाऊराव चव्हाण, जि. प. जिल्हा समाजकल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, आ. णा. वागतकर, इंगोले, चव्हाण, मर्इंग यांच्यासह अधिकारी- कर्मचाºयांच्या स्वाक्षरी आहेत. लेखणी बंद आंदोलनामुळे कामानिमित्त येणाºयांची गैरसोय झाली.
हिंगोलीत काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:46 PM