लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागातील ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबरपासून लेखणीबंद आंदोलन सुरु करण्यात आले.समाजकल्याण आयुक्तालयाने काढलेला अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना २० सप्टेंबर रोजीच निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संघटनेतर्फे राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या लेखणीबंद आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील २६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय हिंगोली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा या कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.या आंदोलनामुळे समाजकल्याण कार्यालयात कामानिमित्त येणाºया नागरिकांची गैरसोय झाली. नागरिकांना कार्यालयात येवून रिकाम्या हातीच माघारी जावे लागले. त्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त होताना दिसून आला. समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वागतकर, सुनील वडकुते, बालासाहेब वाकडे, सिंधू राठोड आदी पदाधिकाºयांची नावे आहेत.
कर्मचा-यांचे लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:35 PM